कामगार संघटनेने एसटी आगार व्यवस्थापकाला धरले धारेवर
• कामगारांना विश्रांतीगॄहातून बाहेर काढल्याचे प्रकरण
• कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पक्षपाती पणा करीत असल्याची तक्रार
तेल्हारा : आगारातील कामगारांना मध्यरात्री विश्रांतीगॄहातून बाहेर काढल्याच्या प्रकरणात जाब विचारण्यासाठी एस टी कामगार संघटनेच्या विभागीय पदाधिकाऱ्यांनी तेल्हारा आगार कार्यालय गाठून ठ्ठीया देत एस एन वानरेंना जाब विचारत धारेवर धरले व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून त्वरीत निकाली काढण्याचे आश्वासन घेतले .
यावेळी ऑगष्ट लाँकडाउन हजेरी ; चालक वाहक जेष्ठतेप्रमाणे कर्तव्य देणे ; तसेच जे सी एफ मधे मान्य केलेले मूद्दे त्वरीत सोडवण्याचे मान्य केले. तसेच झालेल्या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकाने दीलगिरी व्यक्त केली
यावेळी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव तथा बँक संचालक विजय जी साबळे,
विभागीय सचिव रूपम वाघमारे, विभागीय अध्यक्ष कैलास नांदूरकर, विभागिय कोषाध्यक्ष मनिष तिवारी, कार्यालय सचिव देवानंद पाठक, तेल्हारा आगार अध्यक्ष ए आर भोजने, सचिव एस एम मगर, नरेश मूरई व नळकांडेष वि एच गनई, एस वि तळोकार, डि एस तायडे, गुलाम मोतेबर देशमुख व आगार पदाधिकारी डीगेट्स आदींची प्रामुख्याने उपस्थित होते