G-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्यांची मस्जिद भेटीने दौऱ्याची  सुरुवात

G-20 परिषदेसाठी आलेल्या महिला सदस्यांची मस्जिद भेटीने दौऱ्याची  सुरुवात

औरंगाबाद : G-20 परिषदेसाठी तुर्की, इंडोनेशिया, सऊदी अरेबिया या देशाच्या महिला सदस्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात मस्जिद भेटीपासून करण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केल्याने प्रशासनाने तडकाफडकी या महिला सदस्यांना गारखेडा येथील नूरानी जामा मस्जिद ची भेट घडवून आणली.

        औरंगाबाद शहरात दिनांक 27 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसात होऊ घातलेल्या G-20 चे W-20 परिषदेसाठी 29 देशाच्या महिला प्रतिनिधींचे शहरात आगमन झाले आहे. त्यातील अकरा मुस्लिम महिला सदस्यांनी मस्जिद भेटीने आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. त्यावरून पोलीस प्रशासनाने त्वरित गारखेडा स्थित नूरानी जामा मस्जिद कमिटीचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आणि त्यांना सांगितले की G-20 परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधी मस्जिदीला भेट देऊ इच्छितात. त्यावरून मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.  

      ज्यावेळी मोठमोठ्या गाड्यांचा ताफा गारखेडा येथील नुरानी जामा मस्जिद येथे पोहोचला, तेव्हा त्यांना पाहून स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले.  मस्जिद कमिटीचे सदस्य इस्रार पटेल, अजीज मौलाना, मुजीब पटेल इत्यादींनी मस्जिद भेटीसाठी आलेल्या G-20 सर्व महिला सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

       मस्जिद कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी या महिला सदस्यांना विचारणा केली की या नूरानी जमा मस्जिद येथे येण्याची काय विशेष कारण होते? त्यावर 11 मुस्लिम महिला सदस्यांनी सांगितले की त्यांनी गुगल वर सर्च करून या मस्जिद संबंधित माहिती मिळवली होती. आणि त्यांनी ठरविले होते की या मस्जिद भेटीनेच आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार. 

      G-20 च्या या मुस्लिम महिला सदस्यांनी मस्जिदचे डिझाईन आणि कमानी चे बारकाईने निरीक्षण केले आणि कौतुक केले.