आमदार म्हणतो खासदार चवन्नीछाप आहे

आमदार म्हणतो खासदार चवन्नीछाप आहे

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांचे पती व आमदार रवी राणा (Ravi Rana) रूग्णालयात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह (CM Uddhav Thackeray) शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील धारेवर धरलं आहे.

मुख्यमंत्र्यांमध्ये अशा प्रकारचा अहंकार असेल तर एक लक्षात ठेवा रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही. रामाने त्याचा सर्वनाश केला. अहंकाराने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल, असं म्हणत रवी राणांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचं काम संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत, असा घणाघात रवी राणांनी केला आहे.