औरंगाबादचे नामांतराबाबत काँग्रेसची भूमिका काय? : औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कल्याण काळे यांचे कानावर हात...
फुलंब्री, ११ मार्च : शहराचे नामांतर बाबत आपली काय भूमिका आहे? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार इतिहास जलील आंदोलन करीत आहे त्याबद्दल आपली काय भूमिका आहे? असा प्रश्न औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार कल्याण काळे यांना पत्रकारांनी विचारला असता, त्यांनी आपले कानावर हात धरून सांगितले की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपले खासदार कशासाठी बसलेले आहेत मला याबाबत काहीच कल्पना नाही. त्याबाबत मी खासदार साहेबांना विचारून सांगेल.
तसेच कल्याण काळे यांनी सांगितले की आम्हाला नामांतर करण्यास आमचा इतकाच इंटरेस्ट आहे की, या औरंगाबाद शहराचा नाव, या औरंगाबाद जिल्ह्याचा नाव, छत्रपती संभाजी महाराजांचा नाव दिला असेल तर, त्याच्याबद्दल आमची भूमिका नाही की तुम्ही का केला.
परंतु आमचा अजेंडा सर्वधर्मसमभावाचा आहे. काँग्रेस पक्ष हा विकासावर काम करणारा आहे. काँग्रेसमध्ये पूर्वी आठ तासाला एकदा पाणी येत होता, या औरंगाबाद शहरामध्ये, आता छत्रपती संभाजी महाराजांचा नाव देऊन तिथं जर पाणी पंधरा दिवसांनी येणार असेल तर हा महाराजांचा अपमान आहे.
म्हणून आम्हाला नामांतरामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही. आम्हाला इंटरेस्ट येतो सर्वधर्मस्मभावामध्ये, आम्हाला इंटरेस्ट येतो विकासामध्ये, आम्हाला इंटरेस्ट येतो तरुणांना नोकऱ्या देण्यामध्ये. याप्रकारे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माझी आमदार कल्याण काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.