आपली वारी स्वच्छ वारी महा स्वच्छता अभियान

आपली वारी स्वच्छ वारी महा स्वच्छता अभियान

औरंगाबाद : आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपुर यात्रेतील घनकचरा व्यवस्थापनासाठी व्हेरॉक,  महानगरपालिका औरंगाबाद, इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन प्रा. लि. आणि औरंगाबाद छवणीद्वारे खामनदी पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नियोजन केले. दरवर्षी या दिवशी सुमारे ५-६ लाख भाविक पायी वाळुज स्थित पंढरपूरला जातात. नगर नाका ते छोटा पंढरपूरच्या विठठल मंदिरापर्यत, विठृठल भक्तांनी
वारीतील वारकऱ्यांच्या  सेवेसाठी विविध स्टॉल/मंडपही उभारले होते. परंतु या पवित्र कार्यामुळे संपूर्ण मार्गात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. खाम टीमने कार्यक्रमादरम्यान आणि नंतर योग्य व्यवस्थापन, जनजागृती आणि हस्तक्षेप करून स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला.

      इकोसत्वची टीम गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवत असुन या काळात सिड़को, कॅन्टोन्मेंट कॅम्प, पोलीस कर्मचारी आणि अनेक स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आणिे वारीचे पावित्र्य राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करत असतात. या वर्षी, खाम टीममध्ये सहयोग फाऊंडेशनचे स्वयंसेवक, व्हेरॉक गरूपचे कर्मचारी, औरंगाबाद प्लॉगर्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हमेंट आणि इतर अनेक जण सामील झाले होते.

       या दिवसभर चाललेल्या हस्तक्षेपातून, २०० स्वयंसेवकांच्या पाठिंब्याने, टीमने ९६३ किलो वर्गीकृत कचरा संकलन करण्यात यश मिळवले, जे कंपोस्टिंग आणि संसाधन पुनर्प्राप्तीसाठी पाठवले गेले आहे. त्यामुळे जवळून वाहणाऱ्या खाम नदीतील घनकचऱ्याचे  प्रदूषण थेट रोखले गेले. नागरिकांची सतर्कता, जागरूकता, आणि जबाबदारी खाम मिशनला पुढे नेण्यास मदत करेल.