विकास तीर्थ अभियान अमृत पाणीपुरवठा योजनेची पाहणी आणि भेट.

विकास तीर्थ अभियान अमृत पाणीपुरवठा योजनेची पाहणी आणि भेट.

औरंगाबाद,१४ जून (प्रतिनिधी) केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असून ,विशेष जनसंपर्क अभियान सुरू आहे.  केंद्र सरकारने शहरासाठी २७०० कोटी रुपये खर्च करून, अमृत मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे सुरू आहे.

      विकास तीर्थ यात्रा अभियान अंतर्गत शहरातील एक हजार महिलांनी पाणी पुरवठा योजनेस भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केलीत व समाधान व्यक्त केलेत. डिसेंबर 2024 पर्यंत चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असा विश्वास ही व्यक्त केला.

     महानगरपालिकेच्या नऊ बस मधून शेकडो महिलांनी  विकास तीर्थ दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयापासून एस. टी.बसला  झेंडा दाखवून पैठण कडे रवाना झाल्यात.

     नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे  शहरातील प्रति नागरिकास १३५ लिटर याप्रमाणे एकूण  ३२ लाख लोकसंख्येला ६९२  दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.  त्यामुळे चोवीस तास पाणी शहराला मिळणार आहे. सध्या शहराला ११० एम. एल.डी.पाणी मिळते ,त्यात गळतीचे प्रमाण तीस ते पस्तीस टक्के इतके असल्याने पाण्याची टंचाई सुरू आहे. त्यामुळे अमृत मिशन .पाणीपुरवठा योजना ही शहराची विकासची लाईफ लाईन राहणार आहे.

     पाहणी दौऱ्यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजू शिंदे, पैठणचे नगराध्यक्ष विकास लोळगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता कोळी,अनुसूचित जातीचे जालिंदर शेंडगे,मोहन अघाव, नगरसेवक महेश माळवतकर, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, युवा मोर्चाचे हर्षवर्धन कराड ,साहेबराव निकम, अरुण पालवे, महेश मल्लेकर, संदीप साळवे, रोहित साळवे, मंडळ अध्यक्ष सागर पाले, सागर निळकंठ, महिला मोर्चाच्या अमृताताई पालोदकर ,माधुरीताई आदवंत, मीना ताई मिसाळ , लताताई दलाल ,नगरसेवक मनीषा ताई मुंडे,सुनीता ताई माळवतकर, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     नक्षत्रवाडी येथे सुरू असलेल्या वाटर ट्रीटमेंट प्लांट (जलशुद्धीकरण केंद् ) कामाची पाहणी केली. आणि कामाविषयी माहिती जाणून घेतली. किमान सहा मोठ्या एम. टी.पी. प्लांट मधून ४९२ एम.एल. डी.पाण्यावर शुद्धीकरण करण्यात येणार असून ५२ टाक्याद्वारे पाणी वितरित होणार आहे. नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी नळाला उपलब्ध होणार आहे.

     नाथ जलाशयामध्ये मुख्य किनारया पासून दीड कि.मी. अंतरावर जॅकवेल उभारणी सुरू असून, त्याठिकाणी नाथ जलाशयात कॉफर डॅमची उभारणी चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये धरणातील पाणी पातळी वाढली तरी पण, जॅकवेलचे काम विनाअडथळा सुरू राहणार आहे. जॅकवेल पर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. १८३ पिलर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी २६०० एच.पी. ६ मोटरी द्वारे दिवसाला ३९२ एम.एल.डी. लिफ्ट करण्यात येणार आहे.असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

     नाथसागर ते नक्षत्र वाडी ३९ किलोमीटरची मुख्य जलवाहिनीचे आस्तारीकरण काम सुरू असून,या ठिकाणी ही भेट दिली. ४५ कि.मी. जिंदाल आणि वेल्सन कंपनीचे २५०० मीटर व्यासाचे पाईप टाकण्यात येत आहे.जवळपास वीस किमी काम पूर्ण झाले आहे.

     शहरातील नागरिकांना डिसेंबर २०२४ पर्यंत २४ तास पाणी कसे उपलब्ध होईल , यासाठी काम सुरू आहे असे , डॉ. कराड यांनी यावेळी म्हटले.

      शहर पाणी पुरवठा योजनेची कामे प्रगती पथावर असून, लवकरच शहराला पाणी मिळणार असल्याने महिलांनी देखील  समाधान व्यक्त केले. आणि सर्व महिलांनी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती सर्व सामान्य नागरिकांना द्या, असे शहर भाजपा महिला मोर्चच्या जिल्हा अध्यक्ष अमृता ताई पालोदकर यांनी म्हंटले आहे.