दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मित्राचा खून : दोघे अटक
औरंगाबाद दि 13 सप्टेंबर : औरंगाबाद शहरातील सातारा पोलिस स्टेशन अंतर्गत कांचनवाडीत दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघा मित्रांनी एका 18 वर्षीय महेश दिगंबर काकडे नावाचे मित्राचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. खून करणारे दोन्ही आरोपी विकास राहटवाड आणि संदीप उर्फ गुज्जर मुळेकर दोघे राहणार कांचनवाडी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगाबाद शहर क्राईम ब्रांच चे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळुंखे यांचे कडून मिळालेल्या माहितीनुसार 12 सप्टेंबर रोजी दुपारी कांचन वाडी परिसरातील एका इमारतीत मृतक महेश दिगंबर काकडे आणि त्याचे इतर मित्र दारू पीत बसलेले होते. तिथे महेश याचा मित्र विकास रहाटवडे वाढ राहणार कांचनवाडी हा अगोदर पासून दारू पीत बसलेला होता. थोड्यावेळात त्या ठिकाणी विकास याचा मित्र संदीप उर्फ गुज्जर मुळेकर राहणार कांचनवाडी हा पण तिथे आला. चौघांनी सोबत दारू पिली. त्यानंतर विकास याने महेश यास दारू आणण्यासाठी पैसे मागितले असता महेश नी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विकास आणि संदीप या दोघांना महेश चा राग आला. विकास याने महेश चे केस धरून त्याचे डोके स्लॅप वर आदळले. आणि संदीपनी विटा ने महेश च्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. तसेच महेश च्या मित्र राहुल हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यास देखील दोघांनी लाथाबुक्क्यांनी आणि विटा ने ठार मारण्याचे उद्देशाने जखमी केले. त्यावरून पोलिस स्टेशन सातारा येथे दोन्ही आरोपींची विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
घटनेचा तपास पोलीस स्टेशन सातारा अधिकाऱ्यांसह समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत असताना गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी कांचनवाडी तून आरोपी विकास राहटवाड आणि संदीप उर्फ गुज्जर मुळेकर यांना अटक करून सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपींना तात्काळ अटक करण्याची कारवाई औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त (मुख्यालय), श्रीमती मीना मकवाना, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, पोलीस अंमलदार किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख यांनी केली आहे.