असा रोखला दामिनी पथकाने बालविवाह...
औरंगाबाद : दिनांक 18 मार्च : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील दामिनी पथकात कार्यरत पोउपनि अनिता फासाटे यांना चाईल्ड हेल्प लाईन 1098 (MGVS ) च्या टिम मेंबर अम्रपाली बोरडे यांनी मोबाईल द्वारे संपर्क करुन कळविले की, कांचनवाडी या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन 1098 वर एका काँलरने संपर्क करुन दिलेली आहे. त्यासाठी दामीनी पथकाची मद्दत हवी आहे.
अशी माहिती मिळतात दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक आणि तापासाठी यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला त्याबाबतची माहिती दिली. आणि तात्काळ घटनास्थळी जाण्यास आपले सहकारी पोलीस हवालदार मानकर, पोलीस शिपाई ताठे आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 (MGVS ) च्या टिम मेंबर अम्रपाली बोरडे व उमेश श्रीवास्तव यांचे सह घटनास्थळी पोहचल्या. त्या ठिकाणी लग्नासाठीचा मंडप टाकलेला होता. व तिथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा 21 वर्षीय मुलासोबत साखरपुडा विधी होणार असल्याचे अल्पवयीन मुलीच्या आईने त्यांना सांगितले.
बारकाईने विचारपूस आणि तेथील लोकांना विश्वासात घेऊन माहिती घेण्यात आली असता अशी माहिती समोर आली की या अल्पवयीन मुलीचे वडिलांचे पाच महिन्यापूर्वी निधन झाले आहे. कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी अल्पवयीन मुलीच्या आईवर आली. तिला आणखी दोन मुली व एक मुलगा आहे. आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्या साठीच आजचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता अशी कबुली अल्पवयीन मुलीच्या आईने दिली.
दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता फासाटे यांनी त्या अल्पवयीन मुलीची कागदपत्रे तपासून खात्री केली असता तिचे वय सोळा वर्ष असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अल्पवयीन मुलीची आई आणि इतर नातेवाईकांना बाल विवाह प्रतिबंधक कायद्यासंबंधीची माहिती देऊन सांगितले की जर तुम्ही तिचा लग्न लावला तर लग्न लग्न लावणारे, तिथे हजर असलेले सर्व लोक, नवरदेव, नवरदेवाचे नातेवाईक या सर्वांचे विरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल आणि सर्वांना तुरुंगाची हवा खावी लागेल. तसेच इतर बाबी सांगून त्यांचे समुपदेशन केले. मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतरच तिचे लग्न लावून असे मुलीचे आईने आणि नातेवाईकांनी मान्य केले. अल्पवयीन मुलीच्या आईला कलम 149 सीआरपीसी कायद्यान्वये समज देण्यात आली. अशा पद्धतीने दामिनी पथकाचे सतर्कतेने आणि तात्काळ कारवाईमुळे होऊ घातलेला बालविवाह थांबवण्यात आला.