माहिती सेवा समिती (MASS_India) तर्फे कामगारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

माहिती सेवा समिती (MASS_India) तर्फे कामगारांसाठी शुक्रवारी कार्यशाळा

औरंगाबाद : अखिल भारतीय माहिती सेवा समिती (MASS_India) चे वतीने शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, कष्टकरी, कंपनी कामगार, यांचे मूलभूत अधिकार, त्यांचे हक्क, अधिकार, संरक्षण इत्यादी विषयी कायदे विषयक आणि अधिकार संबंधी जनजागृती करण्याच्या हेतूने व जास्तीत जास्त कामगारांना माहिती होण्यासाठी अखिल भारतीय माहिती सेवा समिती ( MASS_India)  तर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक १०.०३.२०२३ रोजी १०:००  वाजता बळवंत वाचनालय औरंगपूरा, औरंगाबाद येथे करण्यात आले आहे.

     या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे एडवोकेट बाळासाहेब वावलकर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वकील संघ) आणि एडवोकेट रवींद्र शिरसाठ असून प्रमुख मार्गदर्शक अखील भारतीय माहिती सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश मंचेरियाल असणार आहेत. या कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी, विविध क्षेत्रातील कामगारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन एडवोकेट शिवानी जयस्वाल ( MASS_India महिला अध्यक्ष व प्रवक्त्या), सत्संगराज सोनवणे (शहराध्यक्ष) इब्राहिम खान (शहराध्यक्ष मध्य) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7304104139 आणि 82379110185 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.