वक्फ बोर्डाची पदभरती परीक्षा या कारणाने पुढे ढकलली....

वक्फ बोर्डाची पदभरती परीक्षा या कारणाने पुढे ढकलली....

औरंगाबाद,२ नोव्हेंबर:  महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध पदांसाठी भरतीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. असे पत्र आज मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा.ताशिलदार यांनी काढले आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

         प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील पदभरतीसाठी दिनांक ४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिराती अनुसरून विविध पदांच्या परीक्षा ४ नोव्हेंबर व ५ नोव्हेंबर २०२३ आयोजित करण्यात आल्या होत्या.

      सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण संदर्भात सुरु असलेले आंदोलनांमुळे काही भागांमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांत वाहतूक व्यवस्था बंद आहे तसेच इंटरनेट सुविधा देखील प्रभावित आहे. परीक्षार्थींना उदभवणाऱ्या संभावित अडचणी विचारात घेता आयोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. परिक्षेच्या सुधारीत तारखा https:mdd.maharashtra.gov.in.https//mahawakf.com व https://mahawakf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार/भरती या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात येतील. असे पत्रात म्हटले आहे.

     मागिल अनेक वर्षांपासून रखडलेली कर्मचारी भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. एकूण ६० पदभरतीसाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत वक्फ मंडळाने उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज मागविले होते. यामध्ये जिल्हा वक्फ अधिकारी/अधिक्षक २५ पदे, कनिष्ठ लिपिक ३१ पदे, लघूटंकलेखक १ पद, कनिष्ठ अभियंता १ पद, विधी सहायक २पदे असे एकूण ६० पदभरतीसाठी ४ व ५ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार होती. ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांना नवीन तारखेसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.