मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण बैठक : मराठा आरक्षणाच्या रोड मॅप वर कार्य होणार

मराठा क्रांती मोर्चाची महत्वपूर्ण बैठक : मराठा आरक्षणाच्या रोड मॅप वर कार्य होणार

आरक्षणाची ५०% मर्यादा वाढविण्यासाठी घटना दुरुस्ती करा!

औरंगाबाद (प्रतिनिधी) क्रांती मोर्चा औरंगाबाद यांची एक महत्वपुर्ण बैठक समनवयकांच्या उपस्थितीत दिनांक १०/०१/२०२२ रोजी पार पडली व महत्वपुर्ण विषयावर चर्चा होतांना आरक्षण या महत्वाच्या मागणीवर आणि न्यायालयीन बाबीवर सखोल अशी चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिका त्याच प्रमाणे औरंगाबाद उच्च न्यायालयात मराठवाडयातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत याचिका प्रलंबीत असुन याबाबत या महत्वपुर्ण बैठकीत सर्वच कायदेशिंर बाबीवर सखोल आणि अभ्यासपुर्ण चर्चा होऊन सर्वोच्च न्यायालया तील पुनर्विचार याचिका आणि हस्ताक्षेप याचिकावर कायदेशीर लढा देण्याची जबाबदारी या बैठकीत जेष्ठ आभ्यासक व हस्तक्षेप याचीका कर्ता राजेंद्र दाते पाटील आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिका कर्ता विनोद पाटील यांचेवर देण्यात आली असुन औरंगाबाद उच्च न्यायालयातील संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडयाचा समावेश होतांना मराठा समाजाच्या आरक्षणाची जी स्थिती होती ती स्थिती परत महाल करण्यासाठी उच्च न्यायालय औरंगाबाद येथील याचिका कर्ते किशोर चव्हाण यांनी पाठपुरावा करावा असे या प्रमुख समन्वयकांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या बैठकीत सर्वानुमते ठरले.
याच बैठकीत पुढील विषय निश्चीत करण्यात आले;


१. मराठवाडयातील मराठा समाजाला मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात यावे.

२. संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ठ होण्यापुर्वी आंध्रप्रदेशात असतांना मराठा समाजाचा इतर मागासवर्गामध्ये समावेश होता याबाबत मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये विना अट सामील झाला होता त्या सर्व मराठा वर्गाला इतर मागास वर्गामध्ये समाविष्ठ करण्यासाठी शासनाकडे आणि आयोगाकडे बाजु मांडणार.

३. अनेक न्यायालयांनी आईच्या जातीचे प्रमाणपत्र पाल्यांसाठी ग्राहय धरले असुन याच धर्तीवर आईच्या जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ सर्व पाल्यांना मिळावा म्हणुन पाठपुरावा करणे.

४. केंद्र शासनाने सर्वदुर कायम स्वरुपी न्याय देण्यासाठी आरक्षणाची ५०टक्के मर्यादा वाढविण्यासाठी घटना दुरुस्ती करावी.

५.केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश केंद्र शासनाने तात्काळ करावा अशी सविस्तर चर्चा होऊन त्याप्रमाणे केंद्र शासनाकडे रितसर मागणी करण्याचे सर्वानुमते ठरले असुन त्याच सोबत वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीर आणि साधारणता १३एकर जागेवर मालकी हक्काचा दावा पुजारी रविंद्र पुराणीक यांनी उच्च न्यायालयात केला आहे, वास्तीक पाहता सदर जागा हि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात रहावी आणि या विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्वजांच्या समाध्या याच १३ एकर जागेत असुन त्यांचे जतन व सर्ंवधन केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे व्हावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा न्यायालयीन व सामाजिक लढा लढणार आहे.

अशा महत्वपुर्ण विषयावर चर्चा होऊन अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले. या बैठकीसाठी प्रामुख्याने जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील उच्च न्यायालयातील याचिका कर्ते किशोर चव्हाण, सर्वोच्च न्यायालया तील याचिका कर्ते विनोद पाटील, त्याच प्रमाणे समनवयक अभिजीत देशमुख, चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रविंद्र काळे, सुनिल कोटकर, नितीन कदम, प्रा.मनिषा मराठे, रेखा वहाटुळे,प्रविण भोसले,रविंद्र वाहटुळे, राजकुमार गाजरे, प्रकाश मते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहीती माध्यमांना सुरेश वाकडे समनवयक मराठा क्रांती मोर्चा यांनी दिली.