पत्रकारांनी महाराष्ट्र घडवला : NUJM चे अधिवेशनात खा. संजय राऊत

पत्रकारांनी महाराष्ट्र घडवला : NUJM चे अधिवेशनात खा. संजय राऊत

कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होईल,  चारित्र्यहनन होईल, अशी पत्रकारिता करु नका -  योगेश वसंत त्रिवेदी यांचे कळकळीचे आवाहन                                              

पत्रकारांनी महाराष्ट्र घडवला! महाराष्ट्रात पत्रकारांचा सन्मान होतो तितका देशभरात कुठेही होत नसावा     - : खा संजय राऊत                                          

पत्रकारांसाठी स्वतंत्र मंत्रालय, महामंडळ व रजिस्ट्रेशन होणे आवश्यक  - शीतल करदेकर                                                     
एनयुजेचे गौरव 2021 शाही समारंभात मान्यवर सन्मानित!                                            

मुंबई, (प्रतिनिधी) : कुणाचेही जीवन उद्ध्वस्त होईल, कुणाचेही चारित्र्यहनन होईल अशी पत्रकारिता करु नका. सकारात्मक पत्रकारिता करुन समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केले. एनयुजे इंडियाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त एनयुजे, महाराष्ट्रचा पहिला जीवनगौरव पुरस्कार अध्यक्ष शीतल करदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या  शारदा मंगल सभागृहात आयोजित शानदार समारंभात संपन्न झाला! ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि जनसंपर्क क्षेत्रात निष्कलंकपणे प्रदीर्घ कारकीर्द करणाऱ्या वीणाताई गावडे यांना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, झी २४ तासचे मुख्य संपादक निलेश खरे आणि मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी योगेश वसंत त्रिवेदी हे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे होते.      

    पत्रकाराने बातमी मध्ये बात आणि मी असे न करता बातमी करावी, असे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख आणि 'सामना' चे संस्थापक संपादक बाळासाहेब ठाकरे हे आवर्जून सांगत असत, याची आठवण करुन देत आपल्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेत बहुमोल अशी रौप्यमहोत्सवी कारकीर्द 'सामना' मध्ये करायला मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगून योगेश वसंत त्रिवेदी पुढे म्हणाले की, पत्रकार आपल्या बातमीने कोणकोणती किमया घडवून आणू शकतो याची महत्वाची दोन उदाहरणे म्हणजे 'सामना'मधील एका बातमीने 'महाराष्ट्र विधानभवनात वेलकम टू विधानभवन' चे 'नमस्कार विधानभवन' हे एक आणि हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या मुंबई उच्च न्यायालयात सादर केली ती सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरण्यात येत डॉ. मनोहर जोशी यांची ११ डिसेंबर १९९५ रोजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.  एनयुजे, महाराष्ट्रच्या रणरागिणी शीतल करदेकर यांच्या कार्याचा गौरव करुन तुमच्या मागण्या  नाकारण्यासाठी कुणाची माय अजून व्यायलेली नाही, असेही योगेश त्रिवेदी यांनी ठणकावून सांगितले तसेच एनयुजे, महाराष्ट्रची यशस्वी घोडदौड कुणीही रोखू शकणार नाही, असेही नमूद केले.          

 

विशेष अतिथी  डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आपल्या चौफेर फटकेबाजीत ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेली नोटबंदी हा सर्वात मोठा गुन्हा असल्याचे परखडपणे सांगितले.      

या  अधिवेशनाचे उद्घाटन 'सामना'चे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत यांनी दीपप्रज्वलन करुन केले .  पत्रकारांच्या मागण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या मागण्या ह्या मोठ्या आहेत. आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी जो काम करतो तोच खरा पत्रकार असल्याचे सांगत संजय राऊत यांनी आपण बाळासाहेबांमुळे  पत्रकार झालो आणि  सर्वसामान्य माणूस हा पत्रकारितेतील गाभा असला पाहिजे अशीच मा बाळासाहेब व इतर संपादकाची शिकवण होती अस सांगितले !महाराष्ट्र घडवण्यामागे पत्रकारांचा मोठा वाटा आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सारख्या थोर पत्रकारांची उणीव आज समाजाला भासणे हे आपलं अपयश असल्याचे सांगून बेळगाव चा प्रश्न  महाराष्ट्रात पत्रकारांनी  जिवंत ठेवल्याचे  सागितले .  बाळासाहेबांनी कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचं वृत्तपत्र असल्याची शिकवण दिली होती! त्यामुळे पत्रकारितेपुढे वेगळे आव्हान नसून समाजातील पीडितांना न्याय देण्याचे एकमेव आव्हान असल्याचे  राऊत यांनी स्पष्ट केले.   महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. महाराष्ट्रात जितका सन्मान पत्रकाराचा होतो तितका देशात कुठे होत नसेल! तसेच पत्रकार हिताचे काम होतच राहील अशी ग्वाही दिली! 


निलेश खरे यांनी सागितले की,लोकशाहीचा चौथा स्तंभ अदृश्य स्वरूपात असतो ! संविधान अथवा जागतिक पातळीवर घटनेत त्याला लिखित स्वरूपात स्थान नाही! अदृश्य स्वरूपात लोकशाही पुढे नेण्याचे काम या स्तंभाला करावे लागते प्रत्येक वेळी आपले अस्तित्व दिसणे आवश्यक नाही समाजाला समाजातील विविध  घटकांचे प्रश्न मांडण्याचे त्याला पुढे नेण्याचे काम आपण पत्रकाराने करायचे असते  ! लोकशाहीचे चारही स्तंभाचा  विचार करताना, राजकीय स्तंभाची विश्वासार्हता पूर्णता संपुष्टात आली आहे दुसरा स्तंभ प्रशासकीय , त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने त्याची विश्वासार्हता संपली आहे आणि न्यायव्यवस्था तिसरा स्तंभ त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन तो धोक्यात आला आहे ! लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार  असेल तर त्यांनी आपली विश्वासार्हता टिकवणे महत्त्वाचे आहे ,चुकीचे प्रश्न मांडणे  , अपप्रचार न करणे यापुरते मर्यादित न राहता आपली विश्वासार्हता मजबूत करणे यासाठी लक्ष दिले पाहिजे ,अन्यथा लोकशाहीचे चार स्तंभ कमकुवत बनतील! माननीय साने गुरुजी यांनी सांगितले होते की सत्य आहे हे काळाच्या ओघात टिकते आणि असत्य  नष्ट होते ! आपण योग्य असू तर निश्चितच टिकू ! अन्यथा पत्रकारिता ही फक्त माध्यम भूमिकेसाठी उरेल! आजच्या अधिवेशनाचे आयोजन आणि विषय लक्षात घेता सत्याची कास धरण्याची ओढ पत्रकारांत निर्माण होईल असा विश्वास वाटतो! यासाठी एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांचे अभिनंदन! 

लोकशाही वाहिनीचे मालक गणेश नायडू यांनी एनयुजे महाराष्ट्र ने जे कार्य हाती घेतले आहे त्यासाठी लोकशाही वाहिनी  पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. 


महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, गणेश नायडू, सचिन चिटणीस, डॉ. प्रवीण बांगर, दिलीप ठाकूर, पूनम मिश्रा, शशिकान्त सिंह, निखील देशपांडे, वैदेही काणेकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील,  वैजंता गोगावले, मनोज वराडे,  मनोज सानप, मुकुंद चिलवंत, डॉ. मिलिंद आवताडे, निलांबरी भोसले, शैलेश बळवंत पोळ, राजेश येवले, सुवर्णा चंद्रकांत पाटील, डॉ. प्रविण बांगर,  प्रकाश काळे, आदिक पाटील, उज्ज्वला भगत, राजेश शेट्ये,  जॉय भोसले, मयूर कांबळे, शिशिर जोशी,  शिरीष गादीया, प्रदीप पंडित,  डॉ रूपेश शिंदे,  डॉ.विजयराज  मगदूम, अनिल फोंडेकर,  डॉ. नितीन खामकर, मुग्धा लाड , काश्मिरा गुंडेविया, दिलीप ठाकूर  अर्चना नेवरेकर,

रियाज देशमुख,  शशिकांत भगत यांच्यासह अनेक मान्यवरांचा त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी यावेळी गौरव  करण्यात आला! तसेच एनयुजे महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट  कार्यरत जिल्हा म्हणून  तर बेळगाव जिल्ह्याचा मराठी माणूस व मराठी भाषेसाठी काम करणारा जिल्हा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला!    

      

  प्रास्ताविक करताना एनयुजे, महाराष्ट्रच्या  अध्यक्ष शीतल करदेकर यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होणार नाही याची दक्षता सर्वच स्तंभांनी घ्यावी, असे आवाहन केले. शीतल करदेकर यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र मंत्री असावा, पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ बनविण्यात यावे आणि पत्रकारांची नोंदणी करण्यात यावी, असे तीन ठराव मांडले जे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.                          

 या अधिवेशनास व गौरव  सोहळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शुभेच्छा संदेश पाठवला ,तर सर्व निमंत्रित मान्यवरानी, मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या!                                                                                    प्रवक्ते  संदीप टक्के, संघटन सचिव कैलास उदमले, कोषाध्यक्ष वैशाली आहेर,डॉ सुभाष सामंत, लक्ष्मीकांत घोणसेपाटील, डॉ. अब्दुल कदीर, शिवाजी नलावडे,संजना गांधी, सुनिल कटेकर, यांच्या सह संपूर्ण कार्यकारिणी व राज्यातील सहकार्‍यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  एनयुजे इंडिया चे नेते शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनात परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रामेश्वरी आहेर हिने  केले!


-संदिप टक्के
प्रवक्ते,एनयुजेमहाराष्ट्र