कर्तव्य पथावरचा संन्यस्थ योद्धा; नरेंद्रजी मोदी : हाजी एजाज़ देशमुख, प्रदेश प्रवक्ता, भाजपा
अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमधार्मियांना केवळ मतांसाठी वापरले गेले हे माझ्यासह कोट्यावधी भारतीयांना कळले. त्यामुळे हळूहळू मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित होऊ लागला. अल्पसंख्यांक समाजाला जाणीवपूर्वक धार्मिक भेदामध्ये भ्रमित करून भाजपच्या राष्ट्रीय विचारधारेपासून दूर राखले गेले. आज अल्पसंख्यांक समाजाला अनुभव मिळत आहे. इतकी वर्षे आपण राष्ट्रहित पाहणाऱ्या सच्च्या पक्षाला दूर राखून मोठे नुकसान करून घेतले आहे. कारण अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी केंद्र सरकार पर्यायाने मोदीजी खरंच खूप गांभीर्याने कार्यरत आहेत हे स्पष्ट दिसत आहे.
भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी अक्षरशः ध्यास घेतलेला हा महापुरुष रात्रंदिवस झपाटून काम करत आहे. भारताची आंतरराष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण सज्जता असे आंतरराष्ट्रीय विषय असो किंवा भारताचे प्रतिस्पर्धी कुरापती करणारे देश असोत सर्वांना जेरीस आणून भारतीय अस्मितेचा परचम आता जगाच्या नकाशावर मोठ्या दिमाखाने फडकत आहे. हे मोदीजींचे यश सर्व जग पाहत आहे. त्याला कौतुकाने प्रतिसाद देत आहे. मुस्लिम राष्ट्र देखील भारतासोबत आदराने आणि अदबीने वागू लागले आहेत. अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या आहेत. केंद्र शासनाच्या विकासाच्या योजना मधून अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानासाठी तब्बल २७ विशेष योजना सुरू आहेत. यापूर्वी सुमारे २० लाख अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक अनुदान मिळत असे, आता पाच कोटी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना याचा लाभ मोदी सरकार च्या काळात मिळत आहे. 'एका हातात कुराण दुसऱ्या हातात संगणक' अशी घोषणा करून अल्पसंख्यांक मध्ये स्वाभिमानाचा नवा हुंकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरला. आता स्पर्धात्मक परीक्षा आणि स्पर्धात्मक यशामध्ये अल्पसंख्यांक समाजाचा टक्का वाढत आहे. त्याचे कारण हेच आहे. स्वतंत्र कश्मीरमध्ये लोकशाही प्रणालीच्या माध्यमातून सरकारमध्ये राज्यसभेवर खासदार निवडून गेला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाचा नवाप्रतिनिधी काश्मीर मधून कार्यरत झाला आहे. ख्रिश्चन समाजाचा प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व समाज घटकांना मानाचे समाज हितासाठी कार्यकर्ता येईल, असे स्थान दिले जात आहे. हा अल्पसंख्यांक समाजाच्या मनासारखा अपेक्षित बदल भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडत आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.
सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्यकर्त्याला विश्वास देत विकासाच्या वाटेवर हा युगपुरुष भक्कमपणे मार्गस्थ आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने त्यांना निरोगी स्वास्थपूर्ण उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारत जगतगुरु बनण्याच्या मार्गावर उत्तर उत्तर अग्रेसर राहो हीच अल्लाह च्या दरबारी मनोभावे प्रार्थना...!
- हाजी एजाज़ देशमुख
(प्रदेश प्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र तथा प्रदेशाध्यक्ष, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र)