मुस्लिम सम्राट औरंगज़ेबांच्या पत्नीच्या कबरीची विटंबना ; समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करा : समाजवादी पक्षाची मागणी
औरंगाबाद, १२ ऑगस्ट: मुस्लिम धर्मीय लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने मुस्लिम सम्राट औरंगज़ेब यांच्या पत्नीच्या 'बीबी का मकबरा' मधील कबरीची विटंबना करणाऱ्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करावे, विटंबना करणाऱ्या कृतींवर आळा घालावा यासाठी आज समाजवादी पक्षाचे औरंगाबाद शहर अध्यक्ष फैसल खान यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्त्व विभागाचे अधिकक्षण पुरातत्वविद डॉ. शिवकुमार भगत यांना निवेदन देण्यात आले.
'बीबी का मकबरा' मधील सम्राट औरंगजेब यांच्या पत्नीच्या कबरीवर भेट देणाऱ्या समाजकंटकांकडून मुस्लिम धर्माच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने पैसे फेकून कबरीची विटंबना केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरून आज समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष फ़ैसल खान यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने 'बीबी का मकबरा' येथे जाऊन भेट दिली असता अनेक पर्यटक कबरीवर पैसे फेकतांना दिसून आले.
समाजकंटकांकडून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने औरंगजेब यांच्या पत्नीच्या कबरीवर पैसे फेकले जात असल्याच्या कृतीवर एका दिवसाचे आंत प्रतिबंध घालण्यात यावा, त्या समाजकंटकांचे विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ नुसार गुन्हे नोंद करण्यात यावेत. असे निवेदन भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकक्षण पुरातत्त्वविद डॉ शिवकुमार भगत यांना देण्यात आले. निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले की जर त्यांचे कडून असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही तर पुरातत्त्व विभागाचे पण त्या समाजकंटकांच्या या कृतीस समर्थन आहे असे गृहीत धरून त्यांचे विरुद्ध पण समाजवादी पक्षाकडून गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पण देण्यात आला.
याप्रसंगी शिष्टमंडळात समाजवादी पक्षाचे शहर कार्यकारी अध्यक्ष रियाज़ अन्सारी, शहर महासचिव डॉ. शरीफोद्दीन, शहर महासचिव शेख मोहसीन, शहर युवा अध्यक्ष मुन्नाभाई, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष मोईन फारुकी, शहर सचिव नदीम पाशा, मध्य सचिव शेख नदीम, वसीम खान, रियाज़ुद्दीन देशमुख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती उपस्थिती होती.