भोंदूबाबा रामगिरीला तात्काळ अटक करा : उपोषण कर्त्याला समाजवादी पक्षाचा पाठिंबा
औरंगाबाद, २१ ऑगस्ट : सरला बेट येथील रामगिरी नावाच्या भोंदू बाबा ने मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद (स) यांच्या चरित्रावर आक्षेपार्ह आणि मुस्लिम धर्मियांचे धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने, तसेच मुस्लिम आणि हिंदू धर्मियांच्या मध्ये धार्मिक देढ निर्माण निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्याला तात्काळ अटक करावी, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट प्रमाणे त्याला स्थानबद्ध करण्यात यावे, महाराष्ट्रातून त्याला कायमचे तडीपार करण्यात यावे या मागणीसाठी मागील तीन दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समाजसेवक साहेब खान पठाण यांनी उपोषण सुरू केले आहे.
साहेब खान पठाण यांना अनेक संघटनांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज समाजवादी पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष फैसल खान यांनी साहेब खान पठाण यांच्या उपोषण मंडपात त्यांची भेट घेऊन त्यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले.