औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतराबाबत नागरिकांच्या हरकती मागितल्या होत्या का? : मुंबई हायकोर्टाचा सवाल

औरंगाबाद व उस्मानाबाद चे नामांतराबाबत नागरिकांच्या हरकती मागितल्या होत्या का? : मुंबई हायकोर्टाचा सवाल

मुंबई, दि.31(प्रतिनिधी) आज  31 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे, मुंबई उच्च न्यायालय येथे औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहराचे नामांतर बाबत सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहराचे नामांतर बद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे, त्यांनी सुरू केलेल्या “नाव बदलण्याच्या प्रक्रिये” बाबत सर्वसामान्यां नागरिकांच्या हरकती मागून त्याच्या विचार केला होता का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला विचारले. मोहम्मद हीशाम उस्मानी यांच्या तर्फे अड श्री. एस.एस. काझी यांनी दाखल केलेल्या मुख्य याचिकेवर आज सुनावणी झाली. आज मुंबई उच्च न्यायालय येथे झालेल्या सुनावणीत तीन याचिकांची संयुक्त सुनावणी झाली. दोन याचिकाकर्त्यांनी सांगितले की राज्य सरकारची नामांतराच्या प्रस्ताव स्वीकारून केंद्र सरकारकडे पाठविण्याची कारवाई अवैध आहे. चौकशीवर केंद्र व राज्य सरकारच्या वकिलांनी मा. न्यायालयाला सांगितले की संपूर्ण कारवाई गृह मंत्रालयाचे 1953 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली गेली होती आणि पुढील तारखेला माननीय न्यायालयासमोर ते तथ्ये ठेवण्यासाठी वेळ मागितला. त्याच वेळी अड. जावेद शेख यांनी मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या याचिकेत नमूद मार्गदर्शक तत्त्वे काढून ते तत्त्वे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याचे वकील म्हणुन ऐड. जावेद शेख यांनी उपस्थित केलेल्या विशिष्ट वादाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला आक्षेप आणि त्यावर विचार करण्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. श्री जावेद शेख यांनी सरकारने हरकती मागवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला बायपास केला असे युक्तिवाद केले, सरकारी वकीलांनी राज्य सरकारला कोणती हरकत प्राप्त झाली किवा नाही याची याची माहिती देण्यास वेळ मागितली. कोणत्या आधारावर नामांतर करण्याचा निर्णय घेतला याबाबत न्यायालयाने विचारले. न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला 15 फेब्रुवारी 2023 रोजी आपली भूमिका मांडण्यास सांगितले. औरंगाबाद याचिकाकर्ता साठी ऐड जावेद शेख, ऐड मोईन शेख, ऐड युसूफ मुचाला, ऐड सगीर व उस्मानाबाद याचिकेसाठी कुमारी तळेकर हजर झाले. पुढची तारीख 15 फेब्रुवारी 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.