लवकरच औरंगाबाद हज हाऊसचे उदघाटन :   हाजी एजाज देशमुख

लवकरच औरंगाबाद हज हाऊसचे उदघाटन :   हाजी एजाज देशमुख

औरंगाबाद, दि.२३ डिसेंबर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने निर्माणाधीन औरंगाबाद हज हाऊस चे काम पूर्ण होणार असून लवकरच  या वास्तूचा लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल. येणाऱ्या सन २०२३ पासून हज यात्रेसाठी औरंगाबाद येथून थेट सौदी अरब येथे यात्रेकरुंना पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशी माहिती महाराष्ट्र राज्य हज समितीचे नवनियुक्त सदस्य हाजी एजाज़ देशमुख यांनी दिली.


     सुभेदारी विश्रामगृहात समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.


      पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबई हज हाऊसमध्ये ज्या प्रकारे स्पर्धा परीक्षेची  तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग दिली जाते, त्याच धर्तीवर औरंगाबाद येथील हज हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना हि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी RTO सरताज खान, साजिद मौलाना, सादीक इनामदार, करंजखेडा येथील सरपंच सय्यद हयास, मजिद खान, शेख सलीम, नबी पटेल, ACP  रियाजोद्दीन देशमुख, आदील पटेल, इरफान खान, फेरोज सरपंच आदी उपस्थित होते.