आंतरराज्य दरोडेखोर छर्रा गॅंग ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केले जेरबंद

बुलडाणा :  दि.16/03/2023 रोजी खामगांव शहरातील गांधी चौक येथे अॅक्टीवा मोटार सायकलच्या डिक्कीतून 6,00,000/-रुपये चोरुन नेल्याबाबत पो.स्टे. खामगांव शहर येथे गु.र.न. 142/2023 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे. खामगांव शहर आणि परिसरात वाढत्या चो·या, घरफोडी मोटार सायकल चोरी, शेतमाल चोरी या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणणे करीता पोलीस अधीक्षक  सारंग आवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते. त्याच अनुशंगाने पोलीस निरीक्षक अशोक लांडे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अभिलेखांवरील गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढून गुन्हे उघडकीस आणणे बाबत तसेच परीक्षेत्रामध्ये अकोला, खामगांव, व यवतमाळ या ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या असल्याने आरोपी हे आजुबाजुच्या परीसरात असण्याची शक्यता असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे  शाखेचे दोन पथके तयार करुन त्यांना सुचना दिल्या होत्या.

    दि. 17/03/2023 रोजी स्थानिक गुन्हे  शाखेचे पथक पो.स्टे. खामगांव शहर येथील गु.र.नं. 142/2023 चे तपास दरम्यान लॉजेस चेक करत असतांना पथकाला बाळापूर रोडवरील, आनंदसागर नजीक तवेरा आणि युनिकॉन गाडीसह 9-10 ईसम दरोडा टाकण्याच्या प्रयत्न्नासाठी लपून बसलेले मिळून आले. त्यातील (1) अजयकुमार अशोकभाई तमंचे वय 42 वर्षे, (2) जिगनेश दिनेश घासी वय 44 वर्षे, (3) रितीक प्रविण बाटुंगे वय 23 वर्षे रा. कुबेरनगर, अहमदाबाद (गुजरात) यांना जागीच पकडण्यात आले. बाकी 07 आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेले होते.

       नमुद आरोपी यांचे कडून मोटार सायकलवर डुप्लीकेट नंबर प्लेट बनविण्या करीता लागणारे रेडीयम स्टिकर, वाहनाचे लॉक तोडण्यासाठी लागणारे अणुकूचिदार टोक असलेले टि Key, दोन धारदार चाकू, चार पेचकच, एक कैची, मिरची पावडर, नगदी रक्कम, तवेरा गाडी आणि युनिकॉन मो.सा. असे 6,76,810-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात येवून पो.स्टे. शेगांव शहर येथे अप.क्र.183/2023 कम 399, 402 भादंवि सह 4/25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्न्हा दाखल करण्यात आला होता.

       उपरोक्त गुन्न्ह्याचे तपासामध्ये आरोपीतांनी खामगांव, अकोला, यवतमाळ येथे यापूर्वी बॅग लिफ्टींग केली असल्याची माहिती मिळाली.

          सदर घटना हि संवेदनशिल असल्याने व परीक्षेत्रामध्ये इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्न्हे घडलेले असल्याने फरार आरोपींना अटक करणे हे एक आव्हान होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक  सारंग आवाड,  अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव,  अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे  शाखा  अशोक लांडे यांनी स्थानिक गुन्हे  शाखेचे एक विशेष पथक तयार करुन त्यांना सुचना देवुन तात्काळ अहमदाबाद गुजरात येथे रवाना केले.

     आरोपी बाबत ( आरोपीचे संपुर्ण नाव, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी. ) कोणतीही  खात्रीशिर माहीती नसतांना आरोपींना अटक करणे हे एक आव्हान होते. तरी देखील सदर पथकाने अहमदाबाद येथील छर्रा नगर, कुबेर नगर या परीसरामध्ये जावुन परीस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना असे निदर्शनास आले की, नमुद परीसर हा संपुर्ण गुन्न्हेगारी वृत्तीचा असुन तेथुन आरोपी आणने ही असंभव गोष्ट असल्याचे पथकाच्या लक्षात आल्या नंतर आरोपीला त्यांचे परीसरामधुन कुशलतेने बाहेर काढण्यासाठी पथकाने वेगवेगळया योजना आखल्या.

      अशाच्या एका योजनेला आरोपी हे बळी पडुन ते अहमदाबाद मधुन बाहेर पडले. व पावागड येथे गेल्याचे गोपनिय माहीती पथकाला मिळाली त्यावरुन पथक तात्काळ पावागड येथे रवाना झाले तेथे गेल्या नंतर ते तिर्थक्षेत्र असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. व नवरात्र उत्सव असल्याने त्या ठिकाणी यात्रा भरलेली होती. त्यामुळे प्रचंड गर्दी होती तरी पथकाने पावागड येथे अहोरात्र परीश्रम घेवुन त्या ठिकाणी असलेले लॉजेस व धर्मशाळा यामध्ये शोध घेतला परंतु आरोपीचा सुगावा लागला नाही.

      पथकाने हार न मानता परत दुस·या दिवशी शोध चालु ठेवला तेंव्हा पथकाला आरोपी हे वडोदरा ते गोध्रा मधील डाकोर या संवेदनशिल परीसरामध्ये असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली. त्यावरुन पथक हे तात्काळ डाकोर साठी रवाना झाले. त्या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला असता आरोपींना पोलीसांचा संशय आल्याने ते पळुन जाण्याच्या प्रयत्न्नात असतांना पथकाने शिताफिने त्यांचा पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतले.

       नमुद पथकाने गुजरात राज्यात राहुन अथक परीश्रम करुन, अत्यंत कुशलतेने आरोपींची गोपनीय माहिती काढून एकुण 6 आरोपींना दिनांक 24/03/2023 रोजी शिताफिने अटक केले.

अटक आरोपींची नावे :-
1. सन्नी सुरेंद्र तमांचे वय 35 वर्षे,  क्षे
2. दिपक धिरुभाई बजरंगे वय 40 वर्षे,
3. मयूर दिनेश बजरंगे वय 39 वर्षे
4. राजेश ऊर्फ राकेश देवची तमांचे वय 49 वर्षे,
5. रवि नारंग गारंगे वय 55 वर्षे,
6. मुन्न्न्नाभाई मेहरुनभाई इंदरेकर वय 60 वर्षे सर्व रा. छर्रा नगर अहमदाबाद गुजरात

आरोपींची गुन्न्हे करण्याची पध्दत :-
1. आरोपी हे गुजरात मधुन निघतांना एक किंवा दोन चारचाकी वाहन व तिन किंवा चार मोटार  सायकल घेवुन एक ठिकाण निवडतात व त्या ठिकाणी येवुन मुक्काम करतात.
2. निवडलेल्या ठिकाणाजवळ प्रसिध्द देवस्थान शोधतात व तेथे राहतात. जेणेकरुन पोलीसांना  कोणताही संशय येवु नये. महाराष्ट्रामध्ये आरोपी हे शेगांव, माहुर, व शिर्डी येथे थांबलेले होते.
3. आलेल्या एकुण लोकांचे दोन गट बनवितात त्यापौकी एक गट बँकेमध्ये जावुन जास्त पौसे कोण काढतो यावर लक्ष ठेवतो. व नंतर त्याचा पाठलाग करतो. व त्याचे इतर साथीदारांना त्याची माहीती  देतो.
4. बॅग गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली असल्यास 5 ते 10 सेकंदामध्ये डिक्कीचे लॉक तोडुन रक्कम लंपास करतात. व हातात असल्यास हिस्कावुन घेवुन गाडीवरुन फरार होतात.
5. बॅग मध्ये जास्त पौसे असल्यास चारचाकी वाहनामध्ये एक टिम तात्काळ पौसे घेवुन रवाना होते.
6. गुन्न्हयात वापरलेल्या गाडीचा क्रमांक हा बनावट असतो. नविन नविन नंबर बनविण्या करीता त्यांचे कडे साहीत्य सोबतच असतात.
7. पकडलेल्या टोळीचे दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक हे कार्यक्षेत्र असल्याचे  तांत्रीक तपासात निष्पन्न झाले आहे.

तपास पथक :-
1. विलासकुमार सानप सहा. पोलीस निरीक्षक
2. गणेश पाटील पोलीस नाईक
3. युवराज राठोड पोलीस नाईक
4. गजानन गोरले पोलीस कॉन्स्टेबल
5. विजय सोनोने पोलीस कॉन्स्टेबल

उघडकीस आलेले गुन्हे :-
1. पो.स्टे. खामगांव शहर येथील गु.र.नं. 142/2023 कलम 379,
2. जि.वाशिम पो.स्टे. कारंजा गु.र.नं.72/2023 कलम 379 भादंवि,
3. यवतमाळ शहर गु.र.नं. 323/2023 कलम 392,34 भादंवि,
4. जिल्हा अकोला पो.स्टे. जूनेशहर गु.र.नं. 72/2023 कलम 379 भादंवि,
  5. महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुध्दा गुन्हे केल्याचे तांत्रीक तपासामध्ये निष्पन्न होत आहे.

जप्त मुददेमाल :-
               नगदी 85800/- , एक तवेरा गाडी , एक युनिकॉन मोटार सायकल व दरोडा टाकण्याचे साहीत्य असा एकुण 6,76,810/- रुपयाचा मुददेमाल

आरोपींचा पुर्व इतिहास :-
            आरोपींवर महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये या अगोदर चोरी, जबरी चोरी व दरोडा यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
मोटार सायकलच्या डिक्कीतून पौशांची किंवा किंमती ऐवजाच्या चोरी प्रकरणी बुलढाणा पोलीसां तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी दुचाकीची डिक्कीचे लॉक व्यवस्थीत असल्याची खात्री करुन त्यामध्ये किंमती ऐवज ठेवावा. वाहन बेवारस स्थितीत सोडून ईतरत्र जावू नये. मोटार सायकलच्या डिक्कीतून किंमती ऐवज चोरी गेल्यास तात्काळ संबंधीत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवावा.

     ही सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बाबुराव महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, अमोल कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. तअशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा., सपोनि. राहूल जंजाळ, विलासकुमार सानप, पोउपनि संदीप सावले पोलीस अंमलदार गणेश किनगे, शरद गिरी, राजकुमार राजपूत, गजानन दराडे, केदार फाळके, अजीज परसूवाले, मधुकर रगड, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, वौभव मगर, विजय सोनोने, सुरेश भिसे, युवराज राठोड, गजानन गोरले, जगदेव टेकाळे, सतिष जाधव, दिगांबर कपाटे, सचिन जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजु आडवे, कैलास ठोंबरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.