ऑटोफॅगी: शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध आणि रमजानच्या रोजाच्या शारीरिक व मानसिक फायद्यांचा संबंध.

उपवास अनिवार्य आहे....
प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे महत्त्व आहे.
हे श्रद्धावंतांनो ! तुमच्यावर उपवास अनिवार्य केले गेले, जसे तुमच्या अगोदरच्या लोकांवर केले गेले होते जेणेकरून तुमच्या मध्ये ईशपरायणता येईल. (कुरआन).
प्रत्येक धर्मामध्ये उपवासाचे स्वरूप भिन्न आहे. रमजानच्या रोज्याचं वैशिष्ट्य आहे की यात 13-14 तास उपाशी तापाशी राहावे लागते. आणि हे उपास पूर्ण महिनाभर चालतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. हे आपण समजून घेऊ.
ऑटोफॅगी म्हणजे काय?
ऑटोफॅगी (Autophagy) ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत शरीर आपल्याच खराब आणि निकामी झालेल्या पेशींचं स्वच्छी करण करतं. या प्रक्रियेत शरीर ज्या पेशी कार्यक्षम नाहीत किंवा ज्या कोणत्या कारणाने निकामी होतात, त्यांना नष्ट करून त्या ठिकाणी नवीन, कार्यक्षम पेशी तयार केली जातात.
ऑटोफॅगी प्रक्रियेचा शास्त्रज्ञांना मोठा महत्त्व:
ऑटोफॅगीच्या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल 2016 मध्ये शास्त्रज्ञ "योशिनोरी ओसुमी" (Yoshinori Ohsumi) यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. योशिनोरी ओसुमी यांनी या प्रक्रियेला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितलं आणि त्यावर शास्त्रज्ञांची मते दिली. त्याने शरीराच्या सेल्समध्ये होणाऱ्या स्वच्छीकरण आणि पुनर्नवीनीकरण प्रक्रियेची गहराईत तपासणी केली आणि सिद्ध केलं की ऑटोफॅगी प्रक्रियेमुळे शरीर निरोगी राहते, वयाच्या वाढीवाही प्रभावीपणे कमी होतो.
रमजानमध्ये रोजा ठेवताना शरीराला उपवासामुळे ऑटोफॅगी प्रक्रिया सक्रिय होण्याची संधी मिळते. रोजा ठेवताना, जेव्हा शरीर अन्न व पाणी घेणं थांबवते, तेव्हा शरीर आपल्या साठवलेल्या चरबीला ऊर्जा म्हणून वापरते. यामुळे खराब झालेल्या पेशींचा नाश होतो, आणि त्यांची जागा नवीन, कार्यक्षम पेशींनी घेतली जाते.
रोजा ठेवून मिळणारे फायदे?
1. शरीराचं शुद्धीकरण: उपवासामुळे ऑटोफॅगी प्रक्रिया सक्रिय होऊन शरीरच्या जुन्या आणि खराब झालेल्या पेशींचं शुद्धीकरण होतं. हे शरीराला अधिक कार्यक्षम बनवतं.
2. वजन कमी होणं: उपवासामुळे शरीर चरबी जाळतं आणि शरीरातील अवांछित साठवलेली चरबी नष्ट केली जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
3. स्ट्रेस कमी होणे: रोजा ठेवताना शरीरात 'कॅर्टिसोल' (Cortisol) नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे ताण व मानसिक दबाव कमी होतो.
4. रोग प्रतिकारशक्तीचा वर्धन: उपवासामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती अधिक सशक्त होते, कारण ऑटोफॅगीच्या प्रक्रियेत शरीर वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतो आणि बॅक्टेरिया व विषाणूंचे नष्ट होणं सुनिश्चित करतो.
5. मानसिक शांती व आत्मज्ञान: रोजा ठेवताना व्यक्तीला मानसिक शांती मिळते. तंत्रिका प्रणाली आणि मनाशी जोडलेल्या जैविक क्रिया कलापांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो, आणि माणसाला अधिक आत्मज्ञान मिळवण्याची संधी मिळते.
6. वजन नियंत्रण:
उपवासाची वेळ वाढविल्याने शरीर साठवलेल्या चरबीचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी करतो, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.
7. रक्तातील साखरेचे (Blood Suger) नियंत्रण.
उपवासामुळे इंसुलिन संवेदनशीलते मध्ये सुधारणा होऊ शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. हे टाईप 2 मधुमेह किंवा प्रीडायबिटीज असलेल्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकते.
8. शरीरातील सूजन कमी होणे:
काही अभ्यासांनुसार, उपवासामुळे शरीरातील सूजन करणारे घटक कमी होऊ शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांची जोखीम कमी होऊ शकते.
9. हृदयाचे आरोग्य:
काही संशोधनानुसार, उपवासामुळे कोलेस्टेरॉलचे स्तर सुधारू शकतात. LDL ("वाईट") कोलेस्टेरॉल कमी होतो आणि HDL ("चांगला") कोलेस्टेरॉल वाढतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर ठरू शकते.
10. मेंदूचे कार्य:
उपवासामुळे मेंदूतील नवीन पेशींच्या निर्मितीला उत्तेजन मिळू शकते आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह यंत्रणा सुधारू शकतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते.
ऑटोफॅगी संशोधन प्रक्रियेच्या माध्यमातून सिद्ध झाले की उपवासामुळे शरीरातल्या खराब पेशी आणि रक्ताचे शुद्धीकरण होतं, आणि नवीन अधिक कार्यक्षम व निरोगी पेशी निर्माण होतात. या प्रक्रियेमुळे शरीराचं पचन तंत्र सुधारतं आणि अंतर्गत ऊर्जा अधिक कार्यक्षम होते.
याच संशोधनामुळे अनेक लोकांना फायदा झाला आणि जपानी शास्त्रज्ञ योशिनोरी यांना नोबल पुरस्कार मिळाला.
शारीरिक व आध्यात्मिक शांती:
रमजानमध्ये रोजा ठेवून मनुष्य मुख्यत्वे ईश्वराच्या आदेशाचे पालन करतो त्यामुळे तो ईश्वराच्या जवळ जातो. या महिन्यात सर्व श्रद्धावंत एकत्रित मिळून रोजा ठेवतात त्यामुळे वातावरणात अध्यात्मिक चैतन्य निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो.
रोजा ठेवल्यास आपल्याला काय मिळेल?
- शारीरिक शुद्धता
- मानसिक ताजगी
- आध्यात्मिक सुख
- जीवनातील स्थिरता
- रोगमुक्त शरीर
- आत्मविश्वास व शांती
यावर विचार करा!....आजच रोजा ठेवा ....आणि आपल्याआरोग्याशी संबंधित एक उत्तम निर्णय घ्या!
यात केवळ शारीरिक लाभ नाही, तर मानसिक, आध्यात्मिक शुद्धता ही आहे. आपल्या जीवनात प्रेम, शांति , श्रद्धा، सबुरी, त्याग, आत्म नियंत्रण आणि आरोग्य राखण्यासाठी ईश्वरीय आदेशानुसार रोजा ठेवला पाहिजे
-इंजिनीयर वाजेद कादरी
जमाते इस्लामी हिंद, औरंगाबाद.